रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीपर्यंत सुरु असलेल्या पावसानंतर आता थंडी सुरु झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी धुकं पडत असून तापमानात चार ते पाच अंशांनी घट झाली आहे. दापोलीत १५ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं केली आहे. थंडीमुळे आंबा पिकासाठी पोषक वातावरण असून काही ठिकाणी पालवी यायला सुरुवात झाली आहे. भातकापणीची कामं काही ठिकाणी अजूनही सुरू आहेत. पावटा, हरभरा, मूग अशा कडधान्यांसह मिरची, वांगी, पालेभाजी आदींची लागवड केली जात आहे.
Site Admin | November 11, 2024 4:03 PM | Ratnagiri | Winter