डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

राज्य विधिमंडळाचं नागपूर इथलं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. ३ मार्च २०२५ पासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा आज सभागृहासमोर मांडला. 

 

१६ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या एकूण सहा बैठका झाल्या. यात ४६ तास २६ मिनिटं कामकाज झालं असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. अधिवेशन कालावधीत १३ विधेयकं संमत तर १५ विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली. अधिवेशनासाठी विधासभा सदस्यांची उपस्थिती ७२ पूर्णांक ९० शतांश टक्के इतकी होती. १५व्या विधानसभेत ७३ सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. 

 

अधिवेशन काळात विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.  विधानपरिषदेच्या ६ बैठका झाल्या.  यात ३६ तास कामकाज झालं, असं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. विधानपरिषदेत चार विधेयकं संमत झाली, तर चार विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली. चार विधेयकं शिफारशीशिवाय विधानसभेकडे परत पाठवण्यात आली तसंच एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवल्याचं सभापतींनी सांगितलं. विधानपरिषदेत सदस्यांची उपस्थिती ७९ पूर्णांक ३० शतांश टक्के इतकी होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा