डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

परभणी आणि बीडमधल्या हिंसाचार प्रकरणी विधानसभेत चर्चा सुरू

परभणीतल्या पुतळा विटंबना, हिंसाचार, आंदोलन आणि बीड जिल्ह्यातल्या हत्येबाबत विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर आज विधानसभेत चर्चा सुरु झाली. काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी चर्चेला सुरुवात केली. परभणीतल्या घटनेनंतर पोलिसांनी दलित वस्तीत घुसून अमानुष मारहाण केली. हे गंभीर आहे, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल त्यांनी केला. 

 

शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले, त्याच्या धक्क्यानं विजयकुमार वाकोडे यांचं निधन झालं. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत आणि सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी राऊत यांनी केली. या सगळ्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक नेमून अथवा सी आय डी मार्फत करावी अशी मागणीही त्यांनी केली. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा