डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर

नक्षलवादाला आळा घालण्यासाठी, शहरी नक्षल अड्डे बंद करण्यासाठी ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक-2024’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले. संविधानावरचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काही संस्था कार्यरत आहेत. अटकेतल्या नक्षलवाद्यांना सोडवण्यासाठी त्या शहरी भागात काम करतात. या संस्थांना आळा घालण्यासाठी हे विधेयक आणल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्रप्रदेशातही अशाप्रकारचा कायदा आहे. राज्यातल्या नक्षल विरोधी पथकानं अशाप्रकारच्या कायद्याची मागणी केली होती. त्यामुळंच हे विधेयक आणत असल्याचं त्यांनी सांगितलं. या विधेयकावर व्यापक चर्चा व्हावी यासाठी संयुक्त चिकीत्सा समितीकडे पाठवण्याची शिफारस त्यांनी केली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा