डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभेत विरोधकांनी परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला

विधानसभेत विरोधकांनी आज कामकाज सुरू झाल्यावर परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर जखमा असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. त्याला कोठडीत पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. याप्रकरणी उद्या चर्चा घेण्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यावर नाराज झालेल्या विरोधकांनी सभात्याग करुन दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. कामकाज सुरू होण्यापूर्वी या मुद्द्यावर विरोधकांनी घोषणाबाजी केली होती. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा