डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी पुढले चार दिवस ४० किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता

उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहार आणि झारखंड इथं पुढले दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्येही उष्णतेची लाट राहील.

महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी पुढले चार दिवस, ताशी ४० किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची तसंच विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिणेकडच्या राज्यात पुढले पाच दिवस हीच स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्येकडची राज्य आणि पश्चिम बंगालमध्ये पुढले सहा दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा