डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही –मुख्यमंत्री

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातील महत्वाकांक्षी सात योजनांबाबत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हास्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करा; तसंच या योजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ कार्यक्रमासाठी शासकीय तसंच विविध प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळानी पात्र उमेदवारांची तातडीने नोंदणी करावी असंही त्यांनी सांगितलं. या योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा