शेतीविषयक विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात वर्ष २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीनं झालेल्या भूसंपादनात जमिनीचा कमी मोबदला मिळालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली असून हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | April 17, 2025 10:48 AM | अमरावती | मुख्यमंत्री | शेतकरी
विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार – मुख्यमंत्री
