रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधले प्रसिद्ध वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. ते ४६ वर्षांचे होते. त्यांनी चिपळूण इथे डोंगरावर जैवविविधतेने समृद्ध असलेला वनीकरण प्रकल्प साकारला होता. वाट चुकलेल्या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन वनविभागाने त्यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली होती.
Site Admin | September 15, 2024 3:36 PM | Wildlife guard Nilesh Bapat