डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 14, 2024 1:43 PM

printer

गहू व्यापाऱ्यांना केवळ दोन हजार टन गहू साठवता येणार

गव्हाच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाचे व्यापारी, ठोक व्यवसायिक त्याचप्रमाणे मोठी किरकोळ विक्रीची साखळी असलेल्यांची गव्हाची साठवणूक मर्यादा कमी केली आहे. या आधी हे व्यापारी ३ हजार टन गव्हाची साठवणूक करु शकत असत, आता त्यांना केवळ दोन हजार टन गहू साठवता येणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंंत्रालयानं हे निर्देश जारी केले आहेत. लहान व्यापाऱ्यांची १० टन साठवणूक क्षमता मात्र जैसे थे ठेवण्यात आली आहे. ही मर्यादा पुढच्या वर्षीच्या ३१ मार्च पर्यंत लागू असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा