राज्यात सरासरीच्या १२३ पूर्णांक २ दशांश टक्के पाऊस झाला असून पेरण्याही समाधानकारक झाल्या आहेत. याबद्दलचं सादरीकरण आज कृषी विभागानं मंत्रिमंडळ बैठकीत केलं. राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत १२८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सुमारे ९१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. राज्यात पुरेशी खतं आणि बियाणं उपलब्ध असल्याचंही कृषी विभागानं सांगितलं आहे. सध्या राज्यातल्या सर्व धरणांमध्ये ३९ पूर्णांक १७ शतांश टक्के पाणीसाठा आहे. राज्यातली १ हजार २१ गावं आणि २ हजार ५१८ वाड्यांना १ हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरू आहे.
Site Admin | July 23, 2024 7:33 PM | Agriculture Department | Cabinet Decision | Water Reserves