डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ठाण्यात ५ कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त

ठाणे पोलिसांनी काल ५ कोटी रुपये किंमतीचं ५ किलो अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी जप्त केली. या प्रकरणी पुण्याजवळ दीघी इथून एकाला अटक करण्यात आली आहे. ८० लाख रुपयांची अंबरग्रीस घेऊन एक जण ठाण्यातल्या साकेत मध्ये येणार असल्याची खबर मिळाल्यावरुन ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकानं ही कारवाई केली. आरोपीला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं असून अधिक तपास सुरु आहे.

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा