डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत ३५ दिवसांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचं काम सुरू करण्यात आलं आहे. यासाठी आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत ३५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान ब्लॉक नसेल. गोरेगाव-कांदिवली विभागातली गर्दी कमी करणं, उपनगरीय गाड्यांच्या वेळांमध्ये सुधारणा करणं आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी समर्पित लाइन्स तयार करण्यासाठी साडेचार किलोमीटरच्या सहाव्या मार्गाचं काम करण्यात येत असल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितलं.  २८ आणि २९ सप्टेंबर आणि ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान लाईन ५ वर नॉन इंटरलॉकिंगचं काम केलं जाणार असल्यानं वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्या ४० ते ५० मिनिटांसाठी नियमित केल्या जातील. ब्लॉक कालावधित काही लांब पल्ल्याच्या गाड्या १५ ते २० मिनिटांनी नियमित केल्या जातील. तर उपनगरी सेवांवरही परिणाम होईल. शंभर ते १४० लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा