डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

स्क्वॉश स्पर्धेत वीर चोत्रानीची लढत मलेशियाच्या अमिशेन राज चंद्रनशी होणार

मुंबईत सुरू असलेल्या पश्चिम भारत स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत आज वीर चोत्रानीची लढत मलेशियाच्या अमिशेन राज चंद्रनशी होणार आहे. काल उपान्त्यपूर्व फेरीत वीरने इजिप्तच्या यासीन शोहदीचा पराभव केला.

महिला एकेरीच्या उपान्त्य लढतीही आज होत आहे. यात अनाहत सिंहचा सामना इजिप्तच्या नूर खफागीशी होणार आहे. आकांक्षा साळुंखेची लढत इजिप्तच्या जना स्वाइफी हिच्याशी होत आहे. उपान्त्यपूर्व फेरीत अनाहतनं अंजली सेमवाल हिला तर आकांक्षानं सेज विंग वाई हिला पराभूत केलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा