पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज अपराजिता महिला आणि बालक अत्याचार विरोधी विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झालं. कोलकाता इथं एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक आणलं आहे. त्याला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवलं जाईल. या विधेयकात बलात्कार आणि लैगिंक छळासाठी कठोर शिक्षा, तसंच फाशीच्या शिक्षेची तरतूद केली असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सभागृहात विधेयकावर चर्चा करताना सांगितलं.
Site Admin | September 3, 2024 8:03 PM | West Bengal Legislative Assembly