कोलकाता शहराच्या काही भागांमध्ये आज आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांनी लावलेले अडथळे तोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी, तसंच जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि लाठीमार केला. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला आहे. आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली, मात्र तरीही विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. सध्या कोलकात्यात तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान, मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये उद्या सकाळी ६ वाजल्यापासून १२ तासांचा बंद पुकारला आहे.
Site Admin | August 27, 2024 8:09 PM | कोलकाता | पश्चिम बंगाल | भाजपा
विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात भाजपातर्फे उद्या पश्चिम बंगाल बंद
