दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार.
दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं जगभरातील विविध दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले आहेत; यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी काल दावोसमधून दूरस्थ प्राणलीच्या माध्यमातून वार्ताहरांशी संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत मुंबईतून सहभागी झाले होते. दावोसमध्ये गुंतवणूकीचे 54 आणि धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकंदर 61 सामजंस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र आता डेटा सेंटरची राजधानी होईल; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.