दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या २९ पैकी २८ कंपन्या भारतातल्या आहेत. २८ पैकी २० राज्यातल्या असताना दावोस दौरा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. २० पैकी १५ मुंबईतल्या, ४ पुण्यातल्या, एक ठाण्यातली आहे, असंही ते म्हणाले. त्याचवेळी गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारापैकी किती अंमलात आले याची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना केलं आहे.
दावोसमध्ये सर्व गुंतवणूकदार एकत्र येतात, त्यामुळं इथे येणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिली आहे.