भारतात आर्थिक सुधारणांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकीच्या पार्श्वभूमीवर जीडीपी अर्थात राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर सात ते आठ टक्के राहील असा अंदाज डब्ल्यूइएफ अर्थात जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी बोर्ग ब्रेन्डे यांनी वर्तवला आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं आज या मंचाची ५५ वी बैठक सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते. या पाच दिवसांच्या बैठकीला १३० देशांचे ३ हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यात साडेतीनशे सरकारी अधिकारी उपस्थित आहेत.
या बैठकीत विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर तसंच सामाजिक आणि आर्थिक लवचिकता वाढवणं याबद्दल चर्चा केली जाणार आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, जलशक्ती मंत्री सी आर पाटील, नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान तसंच कौशल्य विकास आणि व्यावसायिका राज्यमंत्री जयंत चौधरी भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत.