राज्यात आजही हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यात या सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे.
दरम्यान, सूर्याच्या उत्तरायणाला काल २१ डिसेंबरला प्रारंभ झाला. इथून पुढे हळूहळू दिवसाचा कालावधी वाढत जातो. सूर्य काल मकरवृत्तावर असल्यानं कालचा डिसेंबरचा दिवस हा सर्वात लहान म्हणजे अकरा तासांचा तर, रात्र तेरा तासांची होती. उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू झाल्यानंतर दिवस लहान तर रात्र मोठी होते.