डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 30, 2024 2:43 PM | Weather Update

printer

पुढील काही दिवस देशातल्या काही भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावामुळं १ ते ४ जानेवारीपर्यंत हिमालयाच्या पश्चिम भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशात चांगला पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे शेतकरी आणि फळबागायतदार आनंदले असून पर्यटक हिमवर्षावाचा मनमुराद आनंद घेत आहेत. तीन  राष्ट्रीय महामार्गांसह २०० हून अधिक रस्ते, बर्फवृष्टी आणि पावसानंतर पूर्णपणे बंद असून अनेक भागात किमान तापमान शून्याच्या खाली घसरलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये, श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक 270 किलोमीटर लांबीचा महामार्ग काल वाहनांच्या वाहतुकीसाठी पुन्हा उघडण्यात आला. वाईट हवामान आणि प्रचंड बर्फ साचल्यामुळं शुक्रवारपासून महामार्ग दोन दिवस बंद होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा