येत्या तीन दिवसात जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, केरळ, लडाख, गिलगिट, मुजफ्फराबादमधे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. येत्या २६ आणि २७ तारखेला उत्तराखंडमधेही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
गुजरात, तमीळनाडू, पुदुच्चेरी, आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान राहील. तर, इशान्य भारताच्या मैदानी भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसनं वाढ होईल, असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे.