येत्या काही दिवसांत देशातल्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. ओदिशात उद्यापासून मंगळवारपर्यंत तर नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड आणि मेघालयात गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भातही या काळात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम आणि दक्षिण द्वीपकल्प भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील तर पुढच्या आठवड्याच्या मध्यावर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Site Admin | September 21, 2024 2:12 PM | Weather Update