देशाच्या उत्तरेकडच्या डोंगराळ भागात अलिकडेच झालेल्या हिमवृष्टीचा तसंच पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम दिसत आहे. राजस्थान, दिल्ली, हरयाणा आणि उत्तरप्रदेशचा पश्चिमेकडचा भाग थंडीच्या अमलाखाली आहे. थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढचे दोन दिवस या भागात तापमान कमी राहील असा हवामानविभागाचा अंदाज आहे. अरुणाचल प्रदेश, सिक्किम आणि पश्चिम बंगालचा हिमालयातला भाग इथं पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तसंच गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Site Admin | March 5, 2025 3:50 PM | Weather Update
मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा
