आसाम, मेघालय आणि अरुणाचलप्रदेशमध्ये उद्यापर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि हिमवर्षाव होईल, तर अरुणाचल प्रदेशाच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तसंच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ भागातही उद्यापर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिमेकडचे जोरदार वारे जम्मू-काश्मीर आणि खालच्या उष्णकटिबंधीय भागात चक्रीवादळाच्या स्वरूपात सक्रिय आहेत. त्याच्या प्रभावामुळे येत्या शनिवारपर्यंत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये तुरळक ठिकाणी वातावरणात दाट धुक्याचा थर राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.