हिमाचल प्रदेशातील काही भागात थंडीची लाट तसंच पंजाब, हरियाणा, चंडीगढ, उत्तरप्रदेशात दाट धुकं पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राजस्थान, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि वायव्येकडच्या राज्यातही हीच परिस्थिती असेल असं हवामान विभागानं कळवलं आहे. कन्याकुमारी आणि आसपासच्या प्रदेशात चक्रीवादळ आलं आहे. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, करैकल, केरळ, माहे, आंध्रप्रदेशाच्या किनारी भागात तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मच्छिमारांनी दक्षिण श्रीलंकेचा किनारा, बंगालचा उपसागर, मन्नारचे आखात आणि कन्याकुमारीच्या सागरी भागात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.
Site Admin | January 14, 2025 1:42 PM | Weather Update