उत्तर आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम असून तापमानात घट झाली आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वे आणि विमान उड्डाण उशीरानं होत आहेत. जम्मू काश्मीर मधे मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग एनएच ४४ बंद करण्यात आला आहे तसचं श्रीनगर ते कारगिल आणि कारगिल ते झांस्कर रस्ता बंद आहे. कोलकाता विमानतळावर दृश्यमानता कमी असल्यानं सुमारे ६० विमान उड्डाणांना उशीर झाला. झारखंड मधे ७ ते १३ जानेवारी दरम्यान तर बिहार मधे ११ जानेवारीपर्यंत सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत. दिल्लीत आज सकाळी हलक्या पावसानं हजेरी लावली. हरियाणा आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे. भारतीय हवामान विभागानं पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि देशाच्या ईशान्य भागात पुढील दोन दिवस दाट धुक्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
Site Admin | January 6, 2025 1:37 PM | Weather Update