छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या अनेक भागात पाणी साचलं होतं, त्यामुळे नागरीकांची तारांबळ उडाली. सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही काल मुसळधार पाऊस झाला. अजिंठा लेणीतल्या सहस्त्रकुंड धबधब्यासह लहान – मोठे नाले खळखळून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यातही आठवडा भराच्या विश्रांती नंतर काल जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सुकत असलेल्या पिकांना नव संजीवनी मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा, मानोरा, वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांतल्या काही गावांत आठवडाभराच्या विश्रांती नंतर काल पाऊस झाला. या पावसाचा फायदा सुकू लागलेल्या पिकांना होत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला.
Site Admin | July 1, 2024 1:28 PM | wether | wether update
राज्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस
