देशात बहुतांश राज्यात उष्णतेची लाट आलेली असताना काही राज्यांमध्ये मात्र वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य प्रदेशात अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली होती. मात्र, आजपासून पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राजस्थानाच्या बहुतांश भागात पुढचे दोन दिवस वातावरण ढगाळ राहणार असून वावटळी उठण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. पश्चिम बंगालमध्येही कोलकात्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडमध्येही पावसाची शक्यता असून उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.