पूर्व आणि ईशान्य भारतात उद्यापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याच काळात दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळतील.
मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि ओदिशामध्ये आज वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
ईशान्य भारतात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये, तर दक्षिणेकडे तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, लक्षद्वीप, आंध्रप्रदेश किनारपट्टी, तेलंगणा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात पुढले ४ दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
दरम्यान, कोकण, गोवा, गुजरात किनारपट्टी, तामिळनाडू, पुडुचेरी आणि करैकलमध्ये काही भागात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.