हवामान – आगामी तीन ते चार दिवस वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगण इथे उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
तर रविवारपर्यंत पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.