डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सोलापूर विद्यापीठाच्या जमिनीसंदर्भातील प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू – राम शिंदे

सोलापूर विद्यापीठाच्या जमिनीसंदर्भातील प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी लावू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आहे. ते काल सोलापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. विद्यापीठाच्या ४७२ एकर जमिनीपैकी बरीचशी जमीन वनविभागकडे असल्याने विद्यापीठाचा विकास रखडला असल्याची खंत कुलगुरु डॉक्टर प्रकाश महानवर यांनी व्यक्त केली होती. त्यावर वन, कृषी तसंच उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची संयुक्तिक बैठक घेऊन विद्यापीठाचा हा प्रश्न ३१ मे पूर्वी मार्गी लावू, असं शिंदे यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा