वायनाडमध्ये दरड कोसळून झालेली दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. सभागृहात शून्य प्रहरादरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई वाढवून देण्याचीही मागणी केली. अशा प्रकारच्या आपत्तीचा सामना करू शकेल अशा पायाभूत सुविधांसह वायनाडसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन निधी जाहीर करावा, असं राहुल गांधी म्हणाले. वायनाडमध्ये केंद्र आणि राज्यांची सरकारं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन दल यांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं.
Site Admin | August 7, 2024 3:45 PM | Rahul Gandhi | Wayanad Landslide