डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 10, 2025 5:28 PM | WAVES 2025

printer

वेव्हज अंतर्गत अँटी पायरसी चॅलेंज स्पर्धा ठेवण्यात आली

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या वेव्हज अंतर्गत अँटी पायरसी चॅलेंज स्पर्धा ठेवण्यात आली आहे. आजच्या डिजिटल युगात दृक्श्राव्य आशयात होणारी फेरफार तसंच अनधिकृत प्रसारण रोखण्यासाठीची आव्हानं वाढत आहेत. या पायरसीला रोखण्यासाठी फिंगरप्रिंटिंग आणि वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कॉन्फेरडेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचा उद्देश डिजिटल माध्यमावर प्रसारित होणाऱ्या आशयाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान प्रगत करणं हा आहे. वेव्हज उपक्रमाची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा