वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. व्हिडीओ पद्धतीचे आशय तयार करणारे किंवा संकलन विषयात आवड असणारे विद्यार्थी तसंच चित्रपट निर्माते या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. यासाठी त्यांना नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमाच्या व्हिडीओ संग्रहालयाचा वापर करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांचं वय किमान १८ वर्षं असणं आवश्यक आहे. ३१ मार्च ही नोंदणीची शेवटची तारीख असून वेव्हजचा कार्यक्रम येत्या १ मे ते ४ मे या कालावधीत मुंबईत होणार आहे.
Site Admin | February 18, 2025 8:23 PM | WAVES 2025
WAVES अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू
