डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

WAVES Create in India Challenge ची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू झालेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथं होणार आहे. यात १ लाख आशय निर्मात्यांनी नोंदणी केली असून त्यात १ हजार १०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे. अ‍ॅनिमेशन, कॉमिक्स, एआय, एक्सआर, गेमिंग, संगीत, व्हिडीओ अशा विविध क्षेत्रातल्या या स्पर्धकांना आपलं कौशल्य आजमावण्याची संधी यात मिळणार आहे. अंतिम फेरीत विजयी ठरलेल्यांना दुसऱ्या दिवशी वेव्हज क्रिएटर पुरस्कार प्रदान केले जातील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा