वेव्हज २०२५ अंतर्गत खादीच्या वापराला उत्तेजन देण्याकरता नवकल्पना विकसित करण्यासाठी आयोजित केलेल्या मेक द वर्ल्ड वेअर खादी या स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
त्याचबरोबर इनोव्हेट टू एज्यूकेट : हॅण्डहेल्ड डिवाईस डिझाईन चॅलेंज या स्पर्धेच्या दहा विजेत्यांची घोषणाही इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीने केली आहे. हे विजेते येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हजच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.