स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या जागतिक आर्थिक गुंतवणूक परिषदेच्या धर्तीवर वेव्ह्ज २०२५ ही परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासह इतरांशी मुंबईत मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी राज्य शासनाकडून आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | February 11, 2025 7:35 PM | CM Devendra Fadnavis | WAVES 2025
‘वेव्ह्ज २०२५’ परिषद मनोरंजन क्षेत्रातली जागतिक परिषद ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास
