बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज जागतिक दृक् श्राव्य आणि मनोरंजन परिषद वेव्हज २०२५ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही परिषद १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.
समाज माध्यमावर सामायिक केलेल्या व्हिडिओ संदेशात अक्षय कुमारनं या परिषदेचे कौतुक करत याला एक महत्वपूर्ण टप्पा म्हटलं आहे. ही परिषद जगभरातल निर्मात्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरणार नाही, तर जागतिक मनोरंजन क्षेत्राचा भविष्यकाळ बदलणारी अत्यंत शक्तिशाली अशी ही परिषद असेल.कौशल्य विकास, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यांना चालना देणे हा या परिषदेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी :
https://x.com/airnews_mumbai/status/1904498416388030821