वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲंड एंटरटेनमेंट संमेलन वेव्हज एक्सप्लोरर चॅलेंजच्या माध्यमातून कथाकार आणि रचनाकारांना युट्यूब शॉर्ट्स तयार करून आपला भारताबाबतचा दृष्टिकोन जगासमोर मांडण्याची संधी देत आहे. या शॉर्ट्सद्वारे ते भारताची विविधता, प्रामाणिकपणा आणि प्रतिभा टिपू शकतात. शॉर्ट्सचा आशय रचनाकाराचा स्वतःचा असणं आवश्यक आहे. व्लॉगसाठी तयार केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त ७ मिनिटांचा, तर शॉर्ट्स जास्तीतजास्त १ मिनिटाचा असावा.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्हज या कार्यक्रमाचा हा प्रमुख उपक्रम असून तो येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.