मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमधे ट्रेलर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्हिडिओ संपादन, चित्रपट निर्मिती याची आवड असणाऱ्यांसाठी ही स्पर्धा आहे. यात कमीत कमी अठरा वर्षं वयाचे स्पर्धक भाग घेऊ शकतात. ट्रेलर पाठवण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत १ ते ४ मे या कालावधीत होणार आह. जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे.