हैदराबादमधे आज झालेल्या वेव्हज ऍनिम आणि मांगा स्पर्धेत हजारो स्पर्धक आणि संस्थांनी सहभाग नोंदवला. ऍनिम, मांगा, वेबटून्स, कॉस्प्ले यासारख्या क्षेत्रांमध्ये तरुणांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेचा हेतू आहे. ऍनिम आणि मांगा क्षेत्रात पुढच्या पिढीला ओळख मिळवून देण्यासाठीचं हे व्यासपीठ आहे, असं मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव अंकुर भसीन यांनी सांगितलं. याआधी ही स्पर्धा मुंबई, नागपूर, गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर, दिल्ली, वाराणसी, अहमदाबाद आणि चेन्नई इथं झाली आहे. या स्पर्धेच्या विजेत्यांना मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वेव्हज परिषदेत सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
Site Admin | April 12, 2025 8:28 PM | WAVES 2025
हैदराबादमधे वेव्हज ऍनिम आणि मांगा स्पर्धेत हजारो स्पर्धकांचा सहभाग
