मुंबईत येत्या १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वेव्हज या शिखर परिषदेच्या निमित्ताने वेव्हज बाजार हा कायमस्वरूपी ऑनलाईन मंच सुरु करण्यात येणार असून देशातल्या आशय निर्मात्यांसाठी जागतिक स्तरावर आदानप्रदान करण सोपं होणार आहे.
क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ह्ज २०२५ अंतर्गत उद्या नागपूरमध्ये वेव्हज ॲनिमे आणि मँगा अर्थात व्हॅम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये जी. एच. रायसोनी कॉलेजमध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात अनेक प्रतिभावान ॲनिमेटर आणि आशय निर्माते सहभागी होतील.