वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमधे पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात भारतीय सिनेमांचे पोस्टर्स स्पर्धकांना बनवायचे आहेत. या स्पर्धेसाठी आतापर्यंत २९६ जणांनी नोंदणी केली आहे. यात स्पर्धकांना हाताने तसंच डिजिटल साधनांचा वापर करून पोस्टर्स बनवता येतील.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट मुंबईत १ ते ४ मे या कालावधीत होणार आह. जगभरातल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचं लक्ष भारताकडे वेधणं हे या समिटचं उद्दिष्ट आहे.