डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 24, 2025 3:46 PM | WAVES 2025

printer

WAVES 2025: नागपूरमध्ये वेव्हज ॲनिमे आणि मँगा व्हॅम स्पर्धेचं आयोजन

क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ह्ज २०२५ अंतर्गत उद्या नागपूरमध्ये वेव्हज निमे आणि मँगा अर्थात व्हॅम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये जी. एच. रायसोनी कॉलेजमध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात अनेक प्रतिभावान निमेटर आणि आशय निर्माते सहभागी होतील. यात जपानी शैलीतल्या मँगा, डिजिटल कॉमिक्स – वेबटून, जपानी शैलीतलं निमेशन असलेलं निमे आणि कॉस्प्ले असे विभाग असतील. या स्पर्धेव्यतिरिक्त भारतातल्या उदयोन्मुख निमेशन व्यवसायाबद्दल माहितीची देवाणघेवाण होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा