मुंबईत होत असलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ईस्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या ऑनलाईन स्पर्धेत ई-फुटबॉल, WCC आणि BGMI या खेळांचे सामने राष्ट्रीय स्तरावर विविध टप्प्यात होणार आहेत. अधिक माहितीकरता वेव्ह्ज इंडिया डॉट ओआरजी या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
वेव्हज ही जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद मुंबईत १ ते ४ मे या कालावधीत होणार आहे.