मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं गेमिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गेम विकसित करण्याचा अनुभव मिळणार असून, त्यांच्या कल्पकतेला चालना मिळेल. ही स्पर्धा इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्सच्या सहकार्याने आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहितीकरता आपण वेव्ह्ज इंडिया डॉट ओआरजी या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Site Admin | March 16, 2025 6:23 PM | WAVES 2025
वेव्हजमध्ये गेमिंग स्पर्धेचं आयोजन
