वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडियो व्हिज्यूअल ॲण्ड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्हज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल.
जगभरातल्या १०० हून अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईत एक ते चार मे दरम्यान वेव्हज परिषद होणार आहे.