क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत होणाऱ्या वेव्हज २०२५ परिषदेत सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ११२ संगीतकारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८० शास्त्रीय संगीतकार तसंच लोककलाकारांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्देश विविध शैलींच्या संगीताला एकाच छताखाली आणून सादर करणं असा आहे. दूरदर्शन आणि महावीर जैन फिल्म्स यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाची अंतिम फेरी १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.
Site Admin | March 12, 2025 1:28 PM | WAVES 2025
वेव्हजमध्ये सिम्फनी ऑफ इंडिया स्पर्धेचं आयोजन
