मुंबईत होऊ घातलेल्या वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं ऍनिमेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातील ऍनिमेशन क्षेत्राला चालना देण्यासह मांगा, वेबटून आणि ऍनिमेशन या शैलींमधल्या भारतीय प्रतिभेला जगासमोर आणणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या क्षेत्रातले विद्यार्थी, तसंच नवे आणि अनुभवी व्यावसायिक तज्ञ, वैय्यक्तिक आणि संघिक स्वरुपात या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहितीकरता आपण वेव्हज् इंडिया डॉट ओआरजी या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Site Admin | March 9, 2025 2:50 PM | WAVES 2025
वेव्हजमध्ये ऍनिमेशन स्पर्धेचं आयोजन
